महिला परिचर महासंघाचे धरणे आंदाेलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:05+5:302021-08-01T04:32:05+5:30
बुलडाणा : किमान वेतनासह विविध मागण्यांसासठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमाेर २६ जुलैपासून बेमुदत धरणे ...
बुलडाणा : किमान वेतनासह विविध मागण्यांसासठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमाेर २६ जुलैपासून बेमुदत धरणे आंदाेलन सुरू करण्यात आले आहे़ प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने हे आंदाेलन ३१ जुलै राेजीही सुरूच हाेते़
परिचर महिलांना किमान वेतन देऊन त्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, गणवेश व ओळखपत्र देऊन त्यांना कोविड भत्ता देण्यात यावा, पेंशन योजना लागू करून त्यांना भाऊबीज भेट देण्यात यावी, अतिरिक्त कामाचा माेबदला देण्यात यावा, पेंशन याेजना लागू करावी, मासिक मानधन दर महिन्याला ५ तारखेच्या आत प्रदान करावे, चादरी, बेडशीट, पडदे धुलाई भत्ता देण्यात यावा आदींसह इतर मागण्यांसाठी महिला परिचर महासंघाच्या वतीने २६ जुलै पासून येथील जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. मागण्यांची दखल न घेतल्याने हे आंदाेलन ३१ जुलै राेजीही सुरूच हाेते़
महिला परिचरांना तुटपुंजे मानधन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, आरोग्य केंद्र व उपकेंद्रात १९६६ पासून अंशकालीन महिला परिचर या वीस रुपये पगारापासून काम करत आहेत; परंतु महागाईच्या काळात त्यांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी सेवा दिली आहे; परंतु अद्यापही त्यांच्या कार्याची शासनासह प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलनात महासंघाच्या अध्यक्षा राजश्री घोगले, अंजना इंगोले, कुशावर्ता मगर, कमल सातव, शारदा खंडेराव, अनिता आटोळे, दुर्गा चाफे, शोभा लोखंडे, कुसुम बावस्कर, मथुरा कापसे, लक्ष्मी सुसर सहभागी झाल्या आहेत़