जळगाव जामोद येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 12:25 PM2021-08-28T12:25:53+5:302021-08-28T12:26:04+5:30
Female infants found at Jamod in Jalgaon: शनिवारी सकाळी एक स्त्री जातीचा नवजात शिशु सापडल्याने शहरांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : येथील सुनगाव वेस निळकंठेश्वर मंदिराजवळ शनिवारी सकाळी एक स्त्री जातीचा नवजात शिशु सापडल्याने शहरांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. सुनगाव रस्त्यावर उभी एका ट्राली मध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे नवजात शिशु सोडून गेले होते. या घटनेची माहिती बीट जमदार कुसुंबे यांना मिळताच त्यांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालय मध्ये संपर्क साधून तिथे कार्यरत असलेले राजू रघुनाथ बुटे यांच्या सहकार्याने तो नवजात शिशू स्थानिक ग्रामीण रुग्णालय मध्ये आणले. प्रकृतीची तपासणी केली असता त्या नवजात शिशूची प्रकृती सध्या तरी चांगली असल्याची माहिती डॉक्टर यांनी दिली. सदर बालकाला खामगाव येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात येणार आहे. यासंदर्भात जळगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि च्या कलम 370 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.