महिला सरपंचाने रोखला कोरोना वेशीवरच; कोरोनामुक्तीसाठी महिला सरपंचाची जनजागृतीतून धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:28+5:302021-06-27T04:22:28+5:30

मेहकर : तालुक्यातील गंवढाळा/कबंरखेड गट ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ताई गजानन जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने जनजागृती करताना ...

The female sarpanch stopped at the Corona gate; Women Sarpanch's struggle for coronation | महिला सरपंचाने रोखला कोरोना वेशीवरच; कोरोनामुक्तीसाठी महिला सरपंचाची जनजागृतीतून धडपड

महिला सरपंचाने रोखला कोरोना वेशीवरच; कोरोनामुक्तीसाठी महिला सरपंचाची जनजागृतीतून धडपड

Next

मेहकर : तालुक्यातील गंवढाळा/कबंरखेड गट ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ताई गजानन जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने जनजागृती करताना महिला सरपंच अग्रेसर आहेत. गेल्या दीड वर्षापासून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता महिला सरपंच ताई जाधव गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी दिवसरात्र धडपड करून नामी शक्कल लढवत, विविध उपक्रमांतून जनजागृती करीत आहेत. त्यामुळे महिला सरपंचाने कोरोना विषाणूला गावच्या वेशीवरच रोखले आहे.

त्यांच्या धडपडीमुळे या महिला सरपंचाने आपल्या गावासह, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जनजागृती केली आहे. या जनजागृती अभियानास गटविकास अधिकारी, ठाणेदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांनी या अभियानास भेट देऊन महिला सरपंच ताई जाधव यांचे कौतुकसुद्धा केले आहे. टाळेबंदीतसुद्धा प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियामधून महिला सरपंच जनजागृती करतानी प्रसिद्ध झाल्या आहेत.

गावात केली जनजागृती

गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन गावात पंचसूत्री राबवली आहे. घरोघरी जाऊन मास्क वाटणे, साबण, सॅनिटायझर वाटप करणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गरजू लोकांना अन्नधान्य, किराणा साहित्य वाटप करणे, गावात धूळफवारणी, सॅनिटायझर जंतुनाशक फवारणी करणे, स्वच्छता अभियान राबवणे, यासह विविध संदेश देत गावात जनजागृती केली. विविध संदेश देत मेहकर शहरामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, महसूल उपविभागीय कार्यालय या गर्दीच्या ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. ‘कोरोना’ला समूळ नष्ट करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबतही जनजागृती केली आहे. तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य रस्त्यावर ही जनजागृती केली आहे.

दाेन्ही लाटांना राेखले वेशीवरच

अशा विविध जनजागृती उपक्रमांतून महिला सरपंच ताई गजानन जाधव या आपल्या गावासह जिल्हापातळीवर अग्रेसर असल्यामुळे त्यांचा नावलौकिक झाला आहे. कोरोनाची पहिली लाट व दुसरी लाट रोखण्यास महिला सरपंच यशस्वी झाल्या आहेत, तर आता कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महिला सरपंच उपाययोजना आखत आता गाववेशीवर जागता पाहारा देत आहेत. त्यामुळे तिसरी लाटसुद्धा वेशीवरच थांबवणार आहेत. या महिला सरपंचाचा आदर्श वाखाणण्याजोगा असून, गावोगावच्या सरपंचांनी त्यांचा आदर्श घेतला, तर वावगे ठरणार नाही.

Web Title: The female sarpanch stopped at the Corona gate; Women Sarpanch's struggle for coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.