आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:23 PM2017-10-25T14:23:50+5:302017-10-25T14:24:36+5:30
देऊळगावमही येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देऊळगावमही : देऊळगावमही येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष समाधान शिंगणे होते. प्रमुख पाहूणे म्हणून कबीर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. कमलेश खिलारे, बालविकास अधिकारी गणेश वाघ, अंढेरा ठाणेदार विनायक कारेगावकर, दीपक नागरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना आएएस अधिकारी योगेश चित्ते म्हणाले, की अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यशाचे शिखर गाठता येते. प्रयत्नांची पराकाष्ठा ही यशाची गुरूकिल्ली आहे. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. एक दिवस नक्कीच यश पदरात पडते, असे ते म्हणाले. त्याचबरोबर आजच्या तरुण युवकांनी प्रशाकीय सेवेत येऊन देशसेवा करावी. आपल्या देशाला उच्च शिक्षित तरुणांची प्रशाकीय सेवेत गरज असून युवकांनी प्रशासकीय सेवेत यावे, असे चित्ते म्हणाले. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बाल योग गुरू वरद जोशी याचेही यावेळी कौतूक करीत त्याचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दीपक नागरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजित शिंगणे यांनी तर आभार दिनेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशव्यीतेसाठी तालुका बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष राम पर्हाड तसेच सहकारी पत्रकार मित्र यांनी पुढाकार घेतला होता.