खतांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे बजेट बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:06+5:302021-05-19T04:36:06+5:30
नैसर्गिक आपत्तीची सुरू असलेली मालिका त्यातच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनचा सामना गतवर्षीपासून शेतकरी करत आहेत. भाजीपाला आणि नगदी पिकांचे रास्त ...
नैसर्गिक आपत्तीची सुरू असलेली मालिका त्यातच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनचा सामना गतवर्षीपासून शेतकरी करत आहेत. भाजीपाला आणि नगदी पिकांचे रास्त भाव शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या प्रश्नात लक्ष घालण्यात यावे, असेही १८ मे रोजी पाठविलेल्या पत्रात खा.जाधव यांनी नमूद केेल आहे. साधारणतः पाच एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी जर आपण डोळ्यासमोर ठेवला, तर त्याला वर्षभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक धरून १५ बॅग खत लागते. त्यामुळे एका खताच्या बॅगमागे सहाशे ते सातशे रुपये वाढले आहेत. त्यामुळे खताच्या खरेदीसाठी दहा हजार रुपये अधिकचे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार आहेत. सन्मान निधी मिळतो, पण तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने हे धोरण बदलावे. या भाववाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना, ही खत दरवाढ परवडणारी नाही. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, असे खा.जाधव यांनी म्हटले आहे. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी खत दरवाढीचा बोजा त्यांच्यावर लादून काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री यांनी या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष घालून दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.