बुलडाणा जिल्ह्यात अन्न सुरक्षा सप्ताहाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 12:05 PM2021-07-18T12:05:09+5:302021-07-18T12:05:30+5:30

Fiasco of Food security week in Buldana district :  ‘अन्न सुरक्षा सप्ताहा’ची साखळीही खंडित झाल्याचे समोर येत आहे.

Fiasco of Food security week in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात अन्न सुरक्षा सप्ताहाचा बोजवारा

बुलडाणा जिल्ह्यात अन्न सुरक्षा सप्ताहाचा बोजवारा

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जुलै महिन्यात ई-पॉस मशीनमध्ये डाटा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील रेशन वितरण विस्कळीत झालंय. पुरवठा विभागाच्या तांत्रिक गोंधळामुळे  ऐन सणासुदीच्या दिवसात नियमित आणि मोफत धान्य विरतण रखडले असून  ‘अन्न सुरक्षा सप्ताहा’ची साखळीही खंडित झाल्याचे समोर येत आहे. नियोजित मुदतीत धान्य वितरण न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. 
रेशन वितरण प्रणालीत पादर्शकता आणण्यासाठी शासनाने रेशन दुकानदारांना पॉइंट ऑफ सेल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या मशीनद्वारे धान्य वितरित केल्या जात आहे. मात्र,  पुरवठा विभागातील तांत्रिक गोंधळामुळे, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही नियमित आणि मोफत धान्य वितरण रखडले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या दिवसातच ‘अन्न सप्ताहाचा’ बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मागील महिन्यातील मोफत आणि नियमित धान्य वाटप रखडले आहे.

गोदाम पालकांचा पुरवठा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार!
माहे जुलैच्या वाटपामुळे जिल्ह्यातील गोदामात धान्य साठा करण्यास जागा शिल्लक नसल्याचा पत्रव्यवहार जिल्ह्यातील बहुतांश गोदाम पालकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी केला आहे. ई-पॉस मशीनमध्ये डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक स्वस्त धान्य दुकानदार धान्याची उचल करण्यास इच्छुक नाहीत. धान्य वाटप प्रभावित झाल्याचे स्पष्ट करीत गोदामामध्ये जागा उपलब्ध नसल्याचे पत्रात नमूद करीत यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.


काय आहे अन्न  सुरक्षा सप्ताह!
प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा हा अन्न सुरक्षा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. यामध्ये १० तारखेपर्यंत धान्याचे वितरण पूर्ण करण्याचे नियोजन ठरले असते. तर महिन्याच्या १ ते १५ या तारखेपर्यंत नवीन परमिट वितरित केल्या जातात. मात्र तांत्रिक गोंधळामुळे यात समस्या निर्माण झाली आहे.


नियमित वाटपही रखडले!
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात १७ जुलैपर्यंत धान्य वितरणासाठी परमिट पोहोचले नव्हते. त्यामुळे वाटप रखडले असून, द्वारपोच योजनेचेही काम थंड बस्त्यात आहेमशीनमध्ये डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे मागील महिन्यातील मोफत आणि नियमित धान्य वाटप रखडले आहे.

Web Title: Fiasco of Food security week in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.