शेतातील साहित्य लंपास : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:30 AM2021-01-13T05:30:03+5:302021-01-13T05:30:03+5:30
साखरखेर्डा : पोलीस स्टेशन अंतर्गत लव्हाळा आणि शिंदी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ७० हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चाेरट्यांनी ...
साखरखेर्डा : पोलीस स्टेशन अंतर्गत लव्हाळा आणि शिंदी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील ७० हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चाेरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी साखरखेर्डा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शिंदी येथील बागायतदार शेतकरी विनोद खरात यांनी ठिबक सिंचन करण्यासाठी ११ बंडल आणले होते. ते डाळिंब बागेत अंथरून झाडाला पाणी देण्यासाठी ठेवले हाेते. अज्ञात चोरट्यांनी लक्ष ठेवून शेतात ठेवलेले ११ ही बंडल लंपास केले. त्या ११ बंडलांची किंमत बाजारात ३५ हजार रुपये आहे. त्यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहखेड येथील सुखदेव सखाराम जाधव, अशोक सखाराम जाधव, विकास खरात, मधुकर भुसारी, रमेश सीताराम सवडदकर यांच्या शेतात गहू आणि हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी स्पिंकलर पाइप टाकलेले होते. त्या स्पिंकलरवरील ६५ पितळी तोटी काढून अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. त्यांची किंमत बाजारात ३५ हजार रुपये आहे. शेतातील साहित्याची चोरी करण्याचे चोरट्यांचे प्रमाण वाढले असून, शेतकऱ्यांनी याची दखल घेऊन शेतात किंवा शेतशिवारात अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून त्याची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनला द्यावी, अशी माहिती ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिली आहे.