महिला सुरक्षेसाठी दोनाचे पन्नास हात करणार- परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:24+5:302021-08-29T04:33:24+5:30

मेहकर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यावर विशेष भर देणार आहे. यासाठी माझे दोन हात ...

Fifty hands will do for the safety of women - foreigners | महिला सुरक्षेसाठी दोनाचे पन्नास हात करणार- परदेशी

महिला सुरक्षेसाठी दोनाचे पन्नास हात करणार- परदेशी

Next

मेहकर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून, महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यावर विशेष भर देणार आहे. यासाठी माझे दोन हात कमी पडू नये म्हणून समाजातील महिलांना उभे करून दोनाचे पन्नास हात करेल असे प्रतिपादन मेहकरच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी केले. मेहकर येथील नवनियुक्त ठाणेदार यांनी शनिवारी पोलीस स्टेशनमध्ये दक्षता समितीच्या सदस्य महिलांची सभा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ॲड. अंजली देशमुख, ॲड. रूपाली लोहिया, आशाताई झोरे, डॉ. जया आव्हाळे, आरती दीक्षित, लक्ष्मी सोभागे, मंगलाताई राजगुरू, कमल गायकवाड, चित्रलेखा पुरी, पार्वती कान्हे, सहायक पोलीस निरीक्षक आयरे, पोलीस नाईक उमेश घुगे, पो.कॉ. उज्ज्वल शिंदे आदी उपस्थित होते. समाजातील महिलांची त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील किशोरवयीन मुलींची होणारी कुचंबणा लक्षात घेता त्यांना आपले मत कुणाजवळ तरी मोकळेपणाने व्यक्त करता आले पाहिजे. याकरिता महिला दक्षता समितीच्या महिलांनी समोर येऊन काम करावे. संसारिक जीवन जगत असताना काही महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये अनेक वेळा कौटुंबिक वाद होतात. यावेळी अशा कुटुंबाला समुपदेशनाची आवश्यकता असते. आणि तेच काम या महिला दक्षता समितीच्या माध्यमातून करण्याचे नियोजन या बैठकीदरम्यान करण्यात आले आहे.

महिला, मुलींसाठी तक्रारपेटी ठेवणार

महिला व किशोरवयीन मुली यांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणी तक्रारपेटी लावण्यात येणार आहे. या तक्रारींचे शनिवारी होणाऱ्या दक्षता समितीच्या बैठकीत वाचन व निपटारा करण्यात येणार आहे.

किशोरवयीन मुला-मुलींना आपल्या समस्या किंवा तक्रारी या इतरांजवळ करण्याकरिता धाडस होत नाही. यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलामुलींचे मित्रमैत्रिणी होऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करणे हिताचे आहे.

ॲड. रुपाली लोहिया, मेहकर

Web Title: Fifty hands will do for the safety of women - foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.