तटांमुक्ती अध्यक्ष निवडीवरुन दोन गटात धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:39 PM2018-08-28T17:39:00+5:302018-08-28T17:39:41+5:30
सोनोशी: तटांमुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन गटात धक्काबुक्की झाल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली.
सोनोशी: तटांमुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन गटात धक्काबुक्की झाल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत दोन्ही गटाला बाजुला केले. गोंधळ झाल्यामुळे अध्यक्षांनी ही ग्रामसभा तहकूब केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून तटांमुक्त गाव मोहिम संपुर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आली. हेतु होता गावातील तंटे गावातच मिटवणे हा यामागील हेतू होता. मात्र अलीकडे तंटामुक्ती अध्यक्ष निवडीला राजकिय स्वरुप प्राप्त झाले आहे. अध्यक्षपदाला राजकीय गटातटाचे ग्रहण लागल्याने तंटे होत आहेत. सोनोशी येथे मंगळवारी विविध विषयांवर ग्रामसभा आयोजित केली होती. पाणी प्रश्न, वृक्ष लागवड, अनुसूचित जाती घटकांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे, प्लॅस्टिक बंदी अशा विषयांसह गावात तटांमुक्ती अध्यक्ष पदाची निवड हे विषय घेण्यात आले होते. सर्व विषय सपंत आल्यानंतर तटांमुक्ती अध्यक्ष पद निवडीचा विषय समोर ठेवण्यात आला. मात्र यावेळी गटातटाचे राजकारण समोर आले. प्रत्येक गटाने अध्यक्षपदासाठी नाव सुचवले. अध्यक्ष कोण करायचा, हा प्रश्न पडताच गटांमध्ये चढाओढ सुरू झाली. चढाओढीचे रुपांतर थेट धक्काबुक्कीत झाले. विशेष म्हणजे पोलिसांसमोर दोन वेळेस हा प्रकार घडला. सोनोशीमध्ये दरवर्षी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरुन वाद होतो. त्यामुळे बाहेरूण प्रशासकीय अधिकारी पाठवण्यात येतात. परंतू तरीही सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात.