संघटीत होऊन लढा द्या - सानंदा

By admin | Published: July 17, 2017 01:45 AM2017-07-17T01:45:58+5:302017-07-17T01:45:58+5:30

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ फॉर्म भरो अभियान

Fight Organized - Sananda | संघटीत होऊन लढा द्या - सानंदा

संघटीत होऊन लढा द्या - सानंदा

Next
>लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कधी नव्हे असा दुर्देवी प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी संघटीत होवून लढा द्यावा, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
‘माझी कर्ज माफी झालीच नाही’ फॉर्म भरो आंदोलनाच्या शुभारंभा प्रसंगी ते स्थानिक जनसंपर्क कार्यालयात बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, संचालक विलाससिंग इंगळे, प्रमोद चिंचोळकार, डॉ.तब्बसुम हुसैन, सरस्वतीताई खासने, मो.वसीमोदद्ीन, मनिष देशमुख, सुरेश सिंह तोमर, सुरेश वनारे,गजानन वाकुडकर,श्रीकृष्ण धोटे, चैतन्य पाटील,अजय तायडे, संजय तायडे, राजाराम काळणे,संतोष देशमुख यांची उपस्थिती होती. येथील जनसंपर्क कार्यालयावर सकाळी ९ वाजता पासुन ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’फॉर्म भरो अभियानाला प्रारंभ झाला.
या कार्यक्रमाला प्रल्हादराव सातव, गोपाल सातव,ज्ञानेश्वर सुळोकार, राजेंद्रसिंग इंगळे, जगदिश इंगळे, सुनिल इंगळे, भगवानसिंग इंगळे, संजयसिंग इंगळे,गजानन तोमर,सुपडु शाह, अनंता गावंडे,प्रकाश शेळके, पांडुरंग धमार्ळे, वासुदेव लाहुडकार, शैलेष इंगळे,संदिप लाहुडकार,गणेश चव्हाण, डिगांबर चव्हाण, सज्जन चव्हाण, बबलु चव्हाण, गुलाबराव कान्हेरकर, सदाषिव भिसे ,एजाज देषमुख, धनंजय वानखडे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: Fight Organized - Sananda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.