लोणी येथे दोन गटात हाणामारी, पाच घरेही जाळली, पाच गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:22 PM2020-10-05T19:22:42+5:302020-10-05T19:23:00+5:30
Crime News राजेंद्र बाळाजी भोसले यांने तलवारीने विठ्ठल देशमुख यांच्यावर हल्ला केला.
साखरखेर्डा : दोन गटात तुंबळ हाणामारी होउन त्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणी(लव्हाळा) ता . मेहकर येथे ४ आॅक्टोबरच्या रात्री घडली. गावातील पाच घरांची जाळपोळ करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
लोणी ( लव्हाळा ) येथील एका समाजात वाद सुरू होता . नेमका काय वाद आहे म्हणून महादू शिवाजी देशमूख व राजू देशमुख तेथे गेले. दोन्हीकडील लोकांना समजावून सांगत असतांनाच राजेंद्र बाळाजी भोसले यांने तलवारीने विठ्ठल देशमुख यांच्यावर हल्ला केला. तो वार विठ्ठल यांनी डाव्या हातावर घेतल्याने त्याचा हात चिरला . ते गंभिर अवस्थेत असल्योच पाहून महादू हे त्यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही राजेंद्र भोसले याने तलवारीने वार केले. तसेच कपूर भोसले आणि सखाराम भोसले यांनी लाकडी दांड्यांनी मारहाण केली तर दहिमल भोसले यांने राजू देशमुख यांच्या डोक्यात कुºहाडीने वार केले. तसेच इतरही पाच ते सहा व्यक्तींनी आणि महिलांनी तलवार व कुºहाडीने वार करुन चौघांना जखमी केले. याविषयी माहिती मिळताच गावातील युवकांनी त्या वस्तीवर हल्ला करुन चार ते पाच घरे जाळून उध्वस्त केली.या हल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू देशमुख , महादू देशमुख या दोघांना रात्री औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तसेच विठ्ठल देशमुख , श्रीमंत देशमुख यांना बुलडाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . फियार्दी माधव शिवाजी देशमुख तर्फे पी . एस . आय . दिपक राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्र बाळाजी भोसले , कपुर बाळाजी भोसले , सखाराम बाळाजी भोसले , चुमा भोसले , जितेंद्र बाळाजी भोसले यासह पाच महिला आणि इतर आरोपीतांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत.
जाळपोळ प्रकरणी शारदा दहिमल भोसले हिने दिलेल्या फियार्दीत नमूद केले आहे की , माझी मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेली असता अतूल देशमुख याने शिवीगाळ केली . त्यावरुन वाद झाल्यानंतर आमच्या घरांची नासधूस करुन जाळपोळ करण्यात आली . लाठ्या काठ्यांनी मारहाण केली . त्यात माझ्या हाताला मार लागला . यावरुन ठाणेदार संग्राम पाटील यांनी राजू दत्तात्रय देशमुख , महादू शिवाजी देशमुख , विठ्ठल शिवाजी देशमुख , अतुल देशमुख , राजू देशमुख , रविंद्र देशमुख , भैय्यासाहेब देशमुख , अनिल देशमुख , नंदू देशमुख व इतर सात ते आठ व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत . घटनास्थळावर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया , अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले , उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यमावार , ठाणेदार संग्राम पाटील , पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे , यांनी भेट दिली. या घटनेमुळे लोणी येथे तणाव पूर्ण शांतता असून तपास स्वत: ठाणेदार संग्राम पाटील करीत आहेत .