जागेच्या वादातून दाेन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:57+5:302021-05-23T04:34:57+5:30
देऊळगाव राजा : स्थानिक दुर्गापुरा भागात जागेच्या वादातून दाेन गटात २१ मे राेजी तुफान हाणामारी झाली़ दोन्ही गटाच्या ...
देऊळगाव राजा : स्थानिक दुर्गापुरा भागात जागेच्या वादातून दाेन गटात २१ मे राेजी तुफान हाणामारी झाली़ दोन्ही गटाच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दाेन्ही गटाच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच सात जणांना अटक करण्यात आली आहे़
स्थानिक बसस्थानकाजवळ असलेल्या गेस्ट हाऊसला लागून भरत मांटे, रा़ खल्याळ गव्हाण यांच्या मालकीची जागा अजित सिंग बावरे, दुर्गापुरा यांनी ईसार पावतीद्वारे ताब्यात घेतली आहे आणि त्यावर छोटे टिन शेड उभे केले आहे़ त्या जागेवर अवैधपणे अजय शिवरकर, सुनील शिवरकर, महेश शिवरकर, शंकर शिवरकर, सायब शिवरकर यांनी त्यांच्या टीन शेडमध्ये सामान टाकून जागा ताब्यात घेताना २१ मे रोजी दिसले़ त्यावरून अजित सिंग बावरे यांच्या पत्नी अनिता अजितसिंग बावरे यांनी त्यांचे पती अजित सिंग बावरे यांना सांगितले असता त्यांनी अजय शिवरकर आणि इतरांना विचारले़ त्यावर अजय शिवरकर आणि इतरांनी ही जागा माझ्या आजोबाच्या नावे आहे, त्यावर फक्त आमचाच हक्क आहे असे सांगितले असता वादाला सुरुवात झाली़ यामध्ये अजित सिंग बावरे यांनी मध्यस्ती सुभाष दराडे यांना बोलावले असता अजय शिवरकर आणि इतरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला़ यामध्ये सुभाष दराडे यांच्या गळ्यातील एक लाख वीस हजाराची गळ्यातील सोन्याची चेन तोडली आणि शंकर शिवरकर आणि इतरांनी तलवारीने हल्ला केल्याचे अनिता कौर अजित सिंग बावरे यांनी पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ त्यांच्या तक्रारीवरून पाच आरोपी विरुद्ध पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़
दुसऱ्या गटाच्या सुनीता संजय शिवरकर यांनी दिलेल्या तक्रारीत अजित सिंग बावरे, जोगिंदर सिंग बावरे, बलजीत सिंग बावरे आणि इतर साथीदार सर्व राहणार देऊळगाव राजा आमच्या घरात तुम्ही आमच्या जागेत कसे काय राहतात ही जागा आमच्या मालकीची आहे म्हणून शिवीगाळ केली़ तसेच वरील सर्वांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे़ या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपीपैकी एका गटातील चार आणि दुसऱ्या गटातील तीन अशा आरोपींना अटक करण्यात आली आहे़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बसवराज तम शेट्टे आणि पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे हे करीत आहेत़