क्षुल्लक कारणावरून दाेन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST2021-03-04T05:06:01+5:302021-03-04T05:06:01+5:30
शेख आरीफ शेख सत्ता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मार्च राेजी वाढदिवस साजरा करीत असताना आराेपी अबरार ...

क्षुल्लक कारणावरून दाेन गटांत हाणामारी
शेख आरीफ शेख सत्ता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मार्च राेजी वाढदिवस साजरा करीत असताना आराेपी अबरार कुरेशी, सादीक कुरेशी, इजाज कुरेशी आणि सज्जू कुरेशी हे तिथे आले. त्यांनी मद्यप्राशन करण्यासाठी पैसे मागितले. त्यांना पैसे न दिल्याने अबरार कुरेशी याने तलवारीने वार करून जखमी केले. तसेच इतरांनी लाेटपाेट करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बाेराखेडी पाेलिसांनी चारही आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीन आराेपींना पाेलिसांनी अटक केली असून तलवारही जप्त केली आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटाच्या शेख अबरार शेख गफार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेख आरीफ शेख सत्तार, शेख शरीफ शेख सत्ता, शेख आसीफ शे.सत्तार व अन्य एक जण हे वाढदिवस खुल्या जागेत साजरा करीत हाेते. त्यांना काेराेना असल्यामुळे घरी जाऊन वाढदिवस साजरा करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी वाद घालून शेख आरीफ शेख सत्तार याने हातावर तलवार मारून जखमी केले. तसेच इतरांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाेलिसांनी चारही आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत.