१००पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये तीन ते पाच जागांसाठी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:50+5:302021-01-13T05:29:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपमंचायतींसाठी निवडणूक हाेत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तीन हजार १६२ उमेदवारांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपमंचायतींसाठी निवडणूक हाेत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तीन हजार १६२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत. तसेच १०३ ग्रामपंचायतींचे काही सदस्य अविराेध झाल्याने तीन ते पाच जागांसाठी लढती हाेणार आहेत.
बुलडाणा तालुक्यातील खुपगाव, पळसखेड भट, सिंदखेड येथील २१ सदस्य अविराेध झाले आहेत. तसेच चिखली तालुक्यातील चांधइ, मालगणी, अंचरवाडी, मलगी, खाेर येथील ४१ सदस्य अविराेध झाले आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बु, पाडळी शिंदे व नागणगाव येथील २५ सदस्य अविराेध झाले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील काेनाटी, हिवरागडलिंग, आंबेवाडी, कंडारी येथील सर्वच सदस्य अविराेध झाले आहेत. मेहकर तालुक्यातील माेहना खु. व लावणा येथील १४ सदस्य, खामगाव तालुक्यातील पिंप्री काेरडे, पळशी खुद मांडका, काळेगाव येथील ३२, जळगाव जामाेद तालुक्यातील मानेगाव येथील ७, मलकापूर तालुक्यातील कुंड बु येथील ७, नांदुरा तालुक्यातील शेंबा खुद पिपंळखुटा खु. आणि वसाली येथील २० सदस्य अविराेध झाले आहेत. माेताळा तालुक्यातील काेल्ही गवळी, टाकळी घडेकर येथील १३ सदस्य अविराेध झाले आहेत.
जिल्ह्यात ८७५ सदस्य अविराेध
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील ८७५ सदस्य अविराेध झाले आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील ६७, चिखली १४३, देऊळगाव राजा ६२, सिंदखेडराजा ८५, मेहकर ५३, लाेणार १८, खामगाव ११४, शेगाव ४१, जळगाव जामाेद ५७, संग्रामपूर ३७, मलकापूर ४२, नांदुरा ८१ आणि माेताळा तालुक्यातील ७५ सदस्यांचा समावेश आहे. तालुक्यातील २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत.
५२७
निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती
१०३
दोन ते पाच जागांसाठी निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती