अपहार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:34+5:302021-04-13T04:32:34+5:30
मेहकर: सारशिव ग्रामपंचायतमधील तत्कालीन सरपंच व सचिव यांनी ११ लाख ५५ हजार ९९४ रुपयांचा अपहार केला आहे. त्यामुळे, ...
मेहकर: सारशिव ग्रामपंचायतमधील तत्कालीन सरपंच व सचिव यांनी ११ लाख ५५ हजार ९९४ रुपयांचा अपहार केला आहे. त्यामुळे, त्यांच्यािविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी सारशिवच्या सरपंच रमाबाई जाधव व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनीष जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन सरपंच कन्हैयालाल राजाराम मोरे, ज्योती अरुण ढोणे, रंजना रवींद्र वाघ, व ग्रामसेवक यांनी सन २०१५ ते २०२० च्या दरम्यान ग्रामपंचायत सारशिव येथील सरपंच म्हणून यांनी पद भूषविले आहे. यांनी सरपंचपद भूषवताना मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे. गावाचा विकास करण्याच्या नावाने नावाखाली यांनी शासनाकडून आलेल्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा निधीचा अपहार केल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींकडून अपहाराची रक्कम वसूल करावी, तसेच फाैजदारी गुन्हे दाखल करावे,अन्यथा बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा नवनिर्वाचित सरपंच रमाबाई दादाराव जाधव व तंटामुक्ती अध्यक्ष मनीष जाधव यांनी निवेदनात दिला आहे.