विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी एका विरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:12+5:302021-03-27T04:36:12+5:30

: हरणी येथे विना परवाना हातात तलवार घेऊन फिरणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विना परवाना ...

Filed a case against one for carrying a sword without a license | विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी एका विरूद्ध गुन्हा दाखल

विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी एका विरूद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

: हरणी येथे विना परवाना हातात तलवार घेऊन फिरणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी २५ मार्चला ही कारवाई करण्यात आली आहे.

२५ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजेला आरोपी विलास उर्फ गोपाळा सुभाष कबाडे (वय २८ वर्ष रा. टाकरखेड) हा चिखली तालुक्यातील हरणी येथे हातात लहान तलवार घेऊन फिरत होता. यासंदर्भात अमडापूर पोलिसांना माहिती मिळाली. ठाणेदार अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे का. सुमेरसिंह ठाकूर यांनी आरोपीस विना परवाना तलवार बाळगल्या प्रकरणी तलवार जप्त करून आरोपी अटक केली. आरोपी विलास कबाडे यांचे विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमडापूर पोलीस करत आहे.

Web Title: Filed a case against one for carrying a sword without a license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.