विद्यार्थिनींना पळविणा-या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
By admin | Published: March 10, 2017 01:50 AM2017-03-10T01:50:35+5:302017-03-10T01:50:35+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना; सातवीच्या दोन विद्यार्थीनींना दाखवले चॉकलेटचे आमिष
मेहकर, दि. ९- सातवीच्या दोन विद्यार्थीनींना चॉकलेटचे आमिष दाखवून मोटारासायकलवरुन पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बोरी येथील जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळेत मोतखेड येथील बर्याच विद्यार्थीनी शिकतात. या विद्यार्थीनी पायीच जाणे येणे करतात. ९ मार्च रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास ५ ते ६ विद्यार्थीनी पायी शाळेत जात असताना दोन मोटारसायकलवरुन आलेल्या चार जणांनी दोन विद्यार्थीनींना चॉकलेटचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थीनींच्या सर्तकतेमुळे त्यांचा डाव फसला. यासंदर्भात मोतखेड येथील एका पालकाने पोलीसात तक्रार दिली. पोलीसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरवेंद्रसिंह जिवेंद्रसिंह, गजेंद्रसिंह दत्तपालसिंह, जसवेंद्र उत्तरसिंह, जसमेरसिंह दत्तपालसिंह यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.