आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:21 PM2019-03-23T23:21:35+5:302019-03-23T23:21:40+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी लोखंडा व आंबेटाकळी येथील ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खामगाव: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी लोखंडा व आंबेटाकळी येथील ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणूक विभागाच्या सिव्हीजीएल मोबाईल अॅपवर याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. खामगाव तहसिल कार्यालयाच्या फिरते पथक क्रमांक १ चे प्रमुख सुर्यकांत सातपुते यांनी आंबेटाकळी फाटयावर १०.४५ वाजता शहानिशा केली असता बाळापुर रोडवरील मंदिरासमोरील सभागृह लोकार्पण सोहळयाचा
मजकुर असलेला बोर्ड बिनाझकलेला असल्याचे आढळुन आले. बोर्ड झाकण्याची जबाबदारी हि संबंधित ग्रामसेवकाची असल्याने आंबेटाकळी येथील ग्रामसेवक मिसाळ यांचे विरुध्द प्रिवेंशन आॅफ डिफेसमेंट आॅफ द प्रापर्टी अॅक्ट चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पुर्ण करुन परत येत असतांना मौजे लोखंडा येथील गावठानातील पाणी पुरवठा टाकीचे जवळील जलयुक्त शिवार अभियान, राज्सस्तरीय गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत ढाळीचा बांध करणे चे भूमिपुजनाचा बोर्ड बिना झाकलेला असल्याचे आढळुन आले. सदर बोर्ड झाकण्याची जवाबदारी हि संबंधित संबधित ग्रामसेवकाची असल्याने त्यांचे विरुध्द सुध्दा प्रिवेंशन आॅफ डिफेसमेंट आॅफ द प्रापर्टी अॅक्ट चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.