सांस्कृतिक भवनाचा मार्ग मोकळा
By Admin | Published: September 9, 2014 09:20 PM2014-09-09T21:20:58+5:302014-09-09T21:25:56+5:30
बुलडाणा नगराध्यक्षांची माहिती : पालिकेने भरले २५ लाख.
बुलडाणा : बुलडाणा शहरातील सांस्कृतिक वैभव ठरणार्या ह्यसांस्कृतिक भवनह्ण या इमारतीचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले होते. तीन कोटी ११ लाख रुपये खर्चाच्या या कामामध्ये नगरपालिकेला ७५ लाख रुपयांचा हिस्सा राज्य शासनाकडे द्यायचा आहे, त्यापैकी २५ लाख रुपयांचा भरणा नगरपालिकेने केला असून, या कामाला प्रारंभ झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष टी.डी.अंभोरे यांनी दिली.
बुलडाणा पालिकेच्या अग्निसुरक्षा केंद्रासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च असून, त्यापैकी ६९ लाख रुपयांचा खर्च पालिकेला द्यायचा आहे. याकरिता पालिकेने ३0 लाखाचा भरणा केला असल्याचे ते म्हणाले. आठवडी बाजाराचा परिसर पेव्हर्स ब्लॉक लावून चिखलमुक्त करण्यात येणार असून, पालिकेला संरक्षित भिंत व सभागृह यासाठी २ कोटी २५ लाख रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत शहरातील ४६ रस्ते मंजूर झाले असून, त्यासाठी ३ कोटी ६ लाख २९ हजार रुपयांचा निधी पालिकेला मिळाला आहे. येणार्या काळात शाहू नगर येथे नाना-नानी पार्क व व्यास पार्कचे सौंदर्यीकरण तसेच रिंगरोडचे काम तातडीने हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.