पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 04:23 PM2019-11-09T16:23:31+5:302019-11-09T16:23:38+5:30
शुक्रवारी सायंकाळपर्यंत खरीपाची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अद्यापही आकडेमोड सुरू असून प्रत्यक्ष नुकसानाचा अंतिम अहवाल हाती येण्यासाठी सोमवार उजाडण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत खरीपाची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले होते. पाच लाख ५१ हजार ४०४ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून प्रत्यक्ष नुकसानाचे पंचनामे हे चार लाख ९६ हजार ३२५ हेक्टवर करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासकीय पातळीवर पिकनिहाय झालेल्या नुकसााचे आकडे जुळविण्याचे काम सुरू असून प्रत्यक्ष नुकसानाचा अंतिम अहवाल हा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
दुसरीकडे खरीपाच्या हंगामातील सोयाबीन पिकाचे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून जे काही थोडेफार पीक हाती येईल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे तेही काळवंडले आहे. त्यामुळे प्रतवारीत त्याचा टिकाव लागणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षीत मोबदलाही मिळू शकणार नाही.