खरीप हंगामाची अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:23 AM2021-01-01T04:23:35+5:302021-01-01T04:23:35+5:30
खरीप हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे मूग, उडीद पिकापाठोपाठ सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले होते. नदीकाठच्या काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या ...
खरीप हंगामात जास्त पाऊस झाल्यामुळे मूग, उडीद पिकापाठोपाठ सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले होते. नदीकाठच्या काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व एक हजार ४१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. बुलडाणा तालुक्यातील ९८ गावे, अंतिम पीक पैसेवारी ४८ पैसे, चिखली तालुक्यातील १४४ गावांची अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, देऊळगाव राजा तालुक्यातील गावे ६४, अंतिम पीक पैसेवारी ४८ पैसे, मेहकर तालुक्यातील गावे १६१, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, लोणार तालुक्यातील गावे ९१, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, सिंदखेड राजा तालुक्यातील गावे ११४, अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे, मलकापूर तालुक्यातील गावे ७३, अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे, मोताळा तालुक्यातील गावे १२०, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, नांदुरा तालुक्यातील गावे ११२, अंतिम पीक पैसेवारी ४४ पैसे, खामगाव तालुक्यातील गावे १४५, अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे, शेगाव गावे ७३, अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे, जळगाव जामोदमध्ये गावे ११९, अंतिम पीक पैसेवारी ३७ पैसे आणि संग्रामपूर तालुक्यात गावे १०५ व अंतिम पीक पैसेवारी ४७ पैसे आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एक हजार ४१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी ४६ पैसे आली आहे.