नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:50 PM2019-11-12T12:50:08+5:302019-11-12T12:50:20+5:30

कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे.

Final report of loss not submitted! | नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही!

नुकसानाचा अंतिम अहवाल सादरच नाही!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  गत पंधरवाड्यात जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. कृषी विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. राज्यात सत्ता स्थापनेकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष असल्याने शेतकऱ्यांचा कुणी वाली उरला नसल्याचे दिसून येते. यामुळे जिल्ह्यात दीड लाखाहून शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत.
जिल्हयात सर्वत्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर आर्थीक संकट ओढावले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असताना कृषी विभागाकडून मात्र अहवाल सादर करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत डॉ. संजय कुटे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अद्याप नुकसानाचा अहवाल अप्राप्त असल्याचे वास्तव आहे. पंधरा दिवस उलटले असताना जिल्हा प्रशासन नुकसानाचा अहवाल ्प्राप्त करू शकत नसेल, तर शेतकºयांना मदत कधी मिळेल हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Final report of loss not submitted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.