‘समृद्धी’ पिंपळखुटा खासगी बस अपघातप्रकरणी सोमवार पर्यंत अंतिम अहवाल

By निलेश जोशी | Published: July 6, 2023 08:11 PM2023-07-06T20:11:42+5:302023-07-06T20:11:58+5:30

१ जुलै रोजी बस अपघातात २५ जणांचा झाला होता मृत्यू

Final report till Monday in case of 'Samriddhi' Pimpalkhuta private bus accident | ‘समृद्धी’ पिंपळखुटा खासगी बस अपघातप्रकरणी सोमवार पर्यंत अंतिम अहवाल

‘समृद्धी’ पिंपळखुटा खासगी बस अपघातप्रकरणी सोमवार पर्यंत अंतिम अहवाल

googlenewsNext

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी पहाटे खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन त्यात २५ जणांचा जळून मृत्यू झाल्याप्रकरणी सोमवार पर्यंत परिवहन आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. प्राथमिक अहवालानुसार अपघातादरम्यान बस प्रथम रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या स्टीलच्या पोलला धडकली. तेथून पुढे १० ते १५ फुटावर असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकली. यावेळी चालकाने अशा स्थितीत नैसर्गिक सवयीप्रमाणे चालकाने बस डाव्या बाजूला घेतील. त्यावेळी बसचे समोरील चाक आणि मागील चाक (रेअर व्हील) ही कठड्याला धडकले.

याच दरम्यान बसचा फ्रन्ट ॲक्सल तुटून डिझेल टाकीवर धडकला. त्यातील सुमारे ३०० ते ३५० लीटर डिझेल क्रॉप्रेस होऊन डिझेल टाकील मागील बाजून फुटून डिझेल खाली सांडले. याच दरम्यान बस उलटली सोबतच ॲक्लसविना ती घासत गेल्याने जास्त प्रमाणात उष्णता निर्माण झाली सोबतच इंजिन ऑलईही खाली सांडले. ते गरम असल्याने डिझेल व ऑईलचा संपर्क येऊन आग लागल्याचा प्रथमदर्शनी अंदाज प्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे. दरम्यान चालकाला रस्ते संमोहन, डुलकीमुळे बस प्रथम पोलला धडकल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रासद गाजरे यांनी सांगितले. प्राथमिक अहवाल पुर्वी परिवहन आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे. अंतिम अहवालही आगामी दोन ते तीन दिवसात किंवा सोमवारपर्यंत पाठविला जाईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी स्पष्ट केले.

अपघातापूर्वी १५२ किमीचा प्रवास
अपघात होण्यापूर्वी बसन कारंजा येथून समृद्धी महामार्गावर आली होती. तेथे बसचा निश्चित असा ११ वाजून ८ मिनीटाचा वेळ नोंदवला गेला आहे. तेथून १५२ किमी पुढे आल्यानंतर पिंपळखुटा गावानजीक हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसचा वेग हा साधारणत: ७० किमीच्या आसपास होता. त्यावरून कारंजा ते पिंपळखुटा हे अंतर कापण्यासाठी बसला २ तास २४ मिनीटे लागली. त्यामुळे बस अधिक वेगात होती असे म्हणता येत नसल्याचे परिवहन आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

आपतकालीन दरवाजा झाला निष्क्रीय
पोल व पुलाचा कठड्याला बस धडकून डाव्या बाजून उलटली. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असलेली मार्गिका पुर्णपणे बंद झाली व बसच्या उलटल्यामुळे पूर्ण बसच्या बॉडीचे संतुलन बिघडले व आपतकालीन दरवाजा निष्क्रीय झाल्याचेही अनुषंगीक प्राथमिक अहवालात म्हंटले आहे.

 

Web Title: Final report till Monday in case of 'Samriddhi' Pimpalkhuta private bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.