अंतिम वर्षांच्या परीक्षांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 03:55 PM2020-09-08T15:55:22+5:302020-09-08T15:55:39+5:30

विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.

Final year exams will begin in the first week of October | अंतिम वर्षांच्या परीक्षांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरूवात

अंतिम वर्षांच्या परीक्षांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरूवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अंतिम वर्ष आणि सत्रांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने या परीक्षांचे नियोजन केले आहे. याविषयी महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षांना सुरवात होणार आहे. विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.

अंतिम सत्राच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या आॅनलाईन पद्धतीने बहुपर्यायी स्वरुपात होणार आहेत. प्रत्येक युनिटवर १० प्रश्न अशा ६० प्रश्नांपैकी विद्यार्थंना ३० प्रश्न आॅनलाईन पद्धतीने शिकत असलेल्या महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रावर द्यावी लागणार आहे. परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटांचा राहणार आहे. इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या उन्हाळी २०२० परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रीकांचा उपयोग करून त्या प्रश्न पत्रिकेतील कोणतेही तीन प्रश्न विद्यार्थ्यांना दोन तासात सोडवून पूर्ण करायचे आहेत. सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी प्रवेशीत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार आहे. अभियांत्रिकी व तांत्रिक अभ्यासक्रम वगळून इतर अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना असलेल्या अनुशेष सत्राच्या परीखा विद्यापीठाकडे उन्हाळी परीक्षेसाठी तयार असलेल्या प्रश्नपत्रिका एका सत्राच्या रोज तीन प्रश्नपत्रिका व प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील कोतणेही दोन प्रश्न साडून तीन तासात तीन विषयीची परीक्षा पूर्ण करण्यात येईल. तीन विषयाच्या तीन उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयाच परीक्षा केंद्र राहणार आहे. लेखी परीक्षा आॅक्टरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. तसेच १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.

जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी
कोरोना संसर्ग वाढत असल्याने अंतिम वर्ष/सत्रांच्या विद्यार्थ्यांना जवळचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे विनंती करावी, तसेच परीक्षा सुरू होण्याच्या सात दिवसाआधी याविषयी माहिती विद्यापीठाला द्यावी लागणार आहे.त्यामुळे, कोरोनामुळे परीक्षेसाठी महाविद्यालयात न पोहचू शकणाऱ्यांना दिलासा मिळाला.

Web Title: Final year exams will begin in the first week of October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.