अखेर जि. प. शाळेत झाली खळेगाव सरपंचपदाची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:50+5:302021-02-12T04:32:50+5:30
१० फेब्रुवारी रोजी नऊ सदस्य असलेल्या खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करण्यासाठी गावातील सामाजिक सभागृहात बैठक घेण्यात येणार होती. त्यासाठी ...
१० फेब्रुवारी रोजी नऊ सदस्य असलेल्या खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करण्यासाठी गावातील सामाजिक सभागृहात बैठक घेण्यात येणार होती. त्यासाठी नऊ ही सदस्यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या सामाजिक भवनात एकाने अतिक्रमण करून घर थाटल्याने तेथे अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे नायब तहसीलादांना घटनास्थळी जावे लागले होते. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता ही निवडणूक तहकूब करून ११ जानेवारी राेजी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घेण्यात आली. ११ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत मीनल वायाळ यांनी सरपंचपदी अविरोध निवड झाली, तर शकुंतला नागरे यांची उपसरपंचपदी निवड झाली. या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी म्हणून व्ही. पी. नागरे यांनी काम पाहले. त्यांना ग्रामसेवक नंदकिशोर तेजनकर यांनी सहकार्य केले.