अखेर ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:34+5:302021-01-13T05:29:34+5:30
सिंदखेडराजा : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न एरणीवर आला आहे.सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी याच संदर्भात ...
सिंदखेडराजा : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न एरणीवर आला आहे.सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी याच संदर्भात लाेकमतने रियालिटी चेक केला असता येथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समाेर आले हाेते. याविषयीचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच आराेग्य विभागाने त्याची तत्काळ दखल घेत अग्निप्रतिबंध सिलिंडर बसविले आहे.
रविवारच्या अंकात सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे वृत्त आले होते.
दरम्यान, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता बिराजदार यांनी रविवारी आपल्या वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन अग्निशमन यंत्रणा आवश्यक असल्याचे पटवून दिले. त्यानुसार दुपारी २ वाजेपर्यंत अग्निशमन प्रतिबंध सिलिंडर दवाखान्यात उपलब्ध करून त्याचे कर्मचाऱ्यांना समोर प्रात्यक्षिक करण्यात आले. आपत्कालीन वेळी या यंत्रणेचा उपयोग करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.