अखेर शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप उघडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:08 PM2018-11-20T12:08:37+5:302018-11-20T12:08:54+5:30
खामगाव : शहरातील पुरवार गल्लीतील शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून उघडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील पुरवार गल्लीतील शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून उघडण्यात आले. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत या व्यायाम मंदिराला कुलूप ठोकण्यात आले होते, हे येथे उल्लेखनिय! शिवाजी व्यायाम मंदिराला राजकीय वादातून कुलूप ठोकण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांचा ६ नोव्हेंबर रोजी एक आदेश प्राप्त झाला. त्यानुसार खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. या आदेशावरून नगर अभियंता निरंजन जोशी, भूमि विभागाचे डी.टी.थोरवे, अतिक्रमण निमूर्लन विभागाचे मोहन अहीर यांनी सकाळी ११:३० वाजता शिवाजी व्यायाम मंदिर खुले केले. यावेळी शिवाजी व्यायाम मंदिराचे सचिव डिंगाबर खासणे यांना व्यायाम मंदिराचा ताबा देण्यात आला.