अखेर जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:29+5:302021-02-23T04:52:29+5:30
बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव, मलकापूरचा समावेश बुलडाणा: जिल्ह्यात काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता पाच शहरांमध्ये २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ ...
बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव, मलकापूरचा समावेश
बुलडाणा: जिल्ह्यात काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता पाच शहरांमध्ये २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजतापासून ते १ मार्चपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. बुलडाणा, चिखली, देउळगावराजा, खामगाव आणि मलकापूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घाेषित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. शहरांसह ग्रामीण भागातही काेराेना रुग्ण वाढत असल्याने सलग दुसऱ्या दिवशी ३०० पेक्षा जास्त काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण निघाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना म्हणून अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी लाॅकडाऊनच्या निर्देशांचीच घाेषणा केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, खामगाव आणि मलकापूर प्रतिबंधात्मक शहरे घाेषित केले आहेत. या शहरांमध्ये २२ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६ वाजतापासून लाॅकडाऊनचा आदेश देण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकाने ही केवळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.