अखेर राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:15 PM2021-02-16T12:15:44+5:302021-02-16T12:15:50+5:30

Reconstruction of Raheri Bridge येत्या आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Finally pave the way for the reconstruction of Raheri Bridge! | अखेर राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा!

अखेर राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  भारत माला योजनेतंर्गत समाविष्ट असलेल्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय मार्गावरील सिंदखेडराजा तालुक्यात येत असलेल्या व खस्ता हालत झालेल्या ऐतिहासिक राहेरी पुलाच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व अैाषध प्रशासनमंत्री यांनी मुंबईत घेतलेल्या एका बैठकीत या पुलाच्या उभारणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
       गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पुलाचे बांधकाम रखडलेले होते. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एका दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी राहेरी पुलाचे आर.  के. गुप्ता आणि अनुप सूर्यवंशी यांनी संरचनात्मक ऑडिट करत धोकादायक बनलेल्या या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे सुचविले होते. तसेच पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पुनर्बांधणी करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या पुलाच्या बांधकामाचा प्रश्न रखडला होता.त्यातच नागपूर-मुंबई हा मार्ग दर्जोन्नत होवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ सी झाला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अैारंगाबाद विभागातंर्गत हा रस्ता आला आहे. या रस्त्यावरच खडकपूर्णा नदीवर राहेरी गावानजीक  हा पूल आहे. त्याची झालेली दुरवस्था व धोकादायक स्थिती पाहता त्याचे तातडीने पुनर्निर्माण करणे काळाची गरज बनली होती. त्यानुषंगाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीस पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या पुलाच्या पुनर्निर्माणास मान्यता देण्यात आली आहे. 


सहा कोटींचा खर्च अपेक्षित
विशेष दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत या पुलासाठी  ६ मार्च २०१९ रोजी या पुलासाठी ९ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, या पुलाच्या कामासोबतच  राहेरी येथे वळणमार्गही प्रस्तावित असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने वळणमार्गासाठी ६ कोटी २१ लाख रुपये तर पुलाच्या सुपल स्ट्रक्चरसाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.


४१ किमीचा फेरा वाचेल
हा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर अैारंगाबाद तथा मेहकरकडून येणाऱ्या वाहनांचा तब्बल ४१ किमींचा फेरा वाचणार आहे. सोबतच सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील व्यावसायिक व सामान्य नागरिक यांचे आर्थिक नुकसान टळून या मार्गावर रोजागारनिर्मितीस अधिक चालना मिळणार आहे. त्यानुषंगाने पाठपुरावा करून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन वर्षांपासून रखडलेले हे काम मार्गी लावले आहे.

Web Title: Finally pave the way for the reconstruction of Raheri Bridge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.