अखेर अलमपूर येथे निघाली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2016 02:33 AM2016-04-19T02:33:17+5:302016-04-19T02:33:17+5:30

तब्बल दोन तपांनंतर निघाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त मिरवणूक.

Finally, a procession from Alampur | अखेर अलमपूर येथे निघाली मिरवणूक

अखेर अलमपूर येथे निघाली मिरवणूक

Next

नांदुरा (जि. बुलडाणा ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील अलमपूर येथे २४ वर्षांनंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात व उत्साहात सोमवारी मिरवणूक पार पडली. अलमपूर येथील मिरवणुकीला परवानगी नसल्याने गेल्या २४ वर्षांपासून येथे भीम जयंती मिरवणूक काढल्या जात नव्हती. याबाबत यावर्षी पाठपुरावा करण्यात आल्यानंतर प्रशासनाने भीम जयंती मिरवणूक १८ एप्रिल रोजी काढण्याबाबत परवानगी दिली होती. त्यानुसार १८ रोजी सकाळी ९ वाजता बुद्ध विहार येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. आमदार चैनसुख संचेती, अशांत वानखेडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे, भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष राजरत्न तायडे यांच्यासह महिला व पुरुष मोठय़ा संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर समारोपीय सभा घेण्यात आली. आ.संचेती, अशांत वानखडे, भीमराव तायडे यांच्यासह सरपंच कमल शेळके यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. पोलीस प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून अलमपूर येथे येणार्‍या सर्व मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती. मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ७ पोलीस निरीक्षक, ८ सहा. पो.निरीक्षक, १६ पीएसआय, १५८ पोलीस कर्मचारी, ४६ महिला कर्मचारी, २ आरसीपी पथक, २ स्ट्रायकींग फोर्स, १ एसआरपी तुकडी व अन्य २७ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्यावतीने लावण्यात आल्याने अलमपूर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. हा मिरवणूक सोहळा शांततेत पार पडल्यानंतर भीम अनुयायांनी आनंद व्यक्त केला असून, ही परंपरा आता दरवर्षी कायम व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Web Title: Finally, a procession from Alampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.