अखेर स्टेट बँक प्रशासन नमले!

By admin | Published: October 24, 2016 02:41 AM2016-10-24T02:41:57+5:302016-10-24T02:41:57+5:30

स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश; शेतक-यांच्या खात्यात जमा होणार रक्कम.

Finally, the State Bank governs! | अखेर स्टेट बँक प्रशासन नमले!

अखेर स्टेट बँक प्रशासन नमले!

Next

चिखली, दि. २३-तालुक्यातील धोत्रा नाईक येथील स्टेट बँकेचा ग्राहक सेवा केंद्र चालक पसार झाल्याने बँकेत अडकलेली रक्कम परत मिळण्यासाठी वारंवार बँक अधिकार्‍याकडे चकरा मारून विनवणी करूनही बँक टाळाटाळ करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत उंद्री येथील स्टेट बँकेच्या शाखेत सलग दोन दिवस मुक्काम ठोकण्यासह जिल्हाभरात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे अखेर स्टेट बँक प्रशासन नमले असून २४ ऑक्टोबर रोजी या ग्राहक सेवा केंद्रात अडकलेल्या ८३ शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आश्‍वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे.
धोत्रा नाईक येथील स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राचा प्रतिनिधी पांडरंग रमेश बिडवे याने पसिरातील ग्राहक व शेतकर्‍यांना चुना लावून फरार झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले होते. या ग्राहक सेवा केंद्रात अडकलेल्या सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांच्या ठेवी तातडीने परत करण्यात याव्यात या मागणीसाठी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी जिल्हा मुख्यालयी ठिय्या आंदोलन केल्यानंतर बँकेने शेतकर्‍यांची रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र नंतर या आश्‍वासनाला बगल दिल्या जात असल्याने स्वाभिमानीचे राणा चंदन, विनायक सरनाईक, भारत वाघमारे, नितीन राजपूत, राम अंभोरे, सचिन पडघान, नितीन लोखंडे, अनिल चव्हाण, विलास तायडे, शरद राऊत, ज्ञानेश्‍वर मापारी यांच्यासह शेतकर्‍यांनी २0 व २१ ऑक्टोबर रोजी उंद्री येथील स्टेट बँकेच्या शाखेतच मुक्काम ठोकला होता.
दरम्यान, स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍या दुसर्‍या दिवशी जिल्हय़ात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले होते तर ना. तुपकर यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वाभिमानीच्या या आंदोलनापुढे नमते घेत केंद्र चालक बिडवे फरार असल्याने सर्वांंंची रक्कम तातडीने देणे शक्य नसल्याने २१ खातेदारांना शंभर टक्के तर उर्वरित ६२ खातेदारांना २५ टक्के रक्कम अदा करण्याचे मान्य करून शनिवार व रविवारी सुटी असल्याने सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी २१ खातेदारांच्या खात्यात ४ लाख १६ हजार ९५0 तर उर्वरित ६२ खातेदारांच्या खात्यात २५ टक्याप्रमाणे ५ लाख १४ हजार ३५0 असे एकूण ९ लाख ३१ हजार ३00 रुपये जमा करण्याचे तसेच ६२ खातेदारांच्या उर्वरित सर्व रकमेची चौकशी करून आठ दिवसांत जमा करणार असल्याचे ग्वाही दिल्याने स्वाभिमानीच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हक्काचे पैसे मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना स्वाभिमानीच्या या आंदोलनाने मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Finally, the State Bank governs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.