अखेर बिबी ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:44+5:302021-04-16T04:34:44+5:30
बिबी : लसीचा तुडवडा असल्याने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात आले हाेते़. याविषयी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित ...
बिबी : लसीचा तुडवडा असल्याने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात आले हाेते़. याविषयी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित केले हाेते़. या वृत्ताची आराेग्य विभागाने दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाला २०० डाेसचा पुरवठा केला आहे़.
जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे़. त्यामुळे लस घेण्यासाठी बिबी गावासह परिसरातील नागरिक ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. बिबी रुग्णालयाला आतापर्यंत १,६०० (सोळाशे) डाेसचा पुरवठा झाला होता. हे डोस १० एप्रिलपर्यंत देऊन झाले. त्यामुळे ११ एप्रिलपासून लसीकरण बंद झाले होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक सुराणा यांची भेट घेऊन माहिती घेतली असता, वरिष्ठांकडे लसीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले हाेते़. दिनांक २० एप्रिलपर्यंत लस येईल, असेही त्यांनी सांगितले हाेते़. याविषयी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित केले हाेते़. या वृत्ताची आराेग्य विभागाने तातडीने दखल घेत बिबी ग्रामीण रुग्णालयाला २०० डाेसचा पुरवठा केल्यामुळे लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.