वडिलांच्या तेरवीचा कार्यक्रम रद्द करून शाळेला आर्थिक मदत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:13+5:302021-06-11T04:24:13+5:30
स्व. शेषराव पाटील यांनी सावरगाव डुकरे येथील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून बुलडाणा येथील नगर परिषद शाळेत सेवानिवृत्त होईपर्यत ...
स्व. शेषराव पाटील यांनी सावरगाव डुकरे येथील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून बुलडाणा येथील नगर परिषद शाळेत सेवानिवृत्त होईपर्यत सेवा दिली. तथापि त्यांच्या कुटुंबास पूर्वीपासूनच समाज कल्याणाचा व सेवेचा वारसा लाभलेला असल्याने स्व. शेषराव पाटील यांच्या मृत्यूपश्चात तेरवीच्या कार्यक्रमावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो निधी आपल्या वडिलांचे प्राथमिक शिक्षण जेथे झाले त्या शाळेलाच देणगी स्वरूपात दिला. ही मदत नक्कीच सत्कारणी लागेल, या भावनेतून अविनाश पाटील यांनी ११ हजार रुपयांची मदत शाळेला दिली. मदतीचा धनादेश मुख्याध्याक मनोहर जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. या वेळी केंद्रप्रमुख आर.आर. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पाटील, पाटोळे, विजय लंबे, ग्रा.पं. सदस्य पवन पाटील आदी उपस्थित होते.