बँका बंदमुळे आर्थिक व्यवहार कोलमडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:23+5:302021-03-27T04:36:23+5:30
या काळात वर्षभरात झालेल्या व्यवहारांच्या हिशेबाची जुळवाजुळव केली जाते. त्यानंतर आर्थिक वर्ष सुरू होते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसाधारण ...
या काळात वर्षभरात झालेल्या व्यवहारांच्या हिशेबाची जुळवाजुळव केली जाते. त्यानंतर आर्थिक वर्ष सुरू होते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसाधारण सुटी घेतली जाते. आठ दिवसांच्या सुट्या येत असल्याने आर्थिक व्यवहार कोलमडणार असल्याचे दिसून येते. २७ मार्च (शनिवार), २८ मार्च (रविवार), २९ मार्च (सोमवार, होळी) ३१ मार्च (बुधवार, मार्च एण्ड), १ एप्रिल (गुरुवार), २ एप्रिल (शुक्रवार), ३ एप्रिल (शनिवार) व ४ एप्रिल (रविवार) असे एकूण आठ दिवस बँकिंग व्यवहार बंद राहणार आहेत.
एटीएम सुरू ठेवावे. आठ दिवस बँकिंग व्यवहार बंद असले तरी शहरातील सर्व बँकांतील एटीएममध्ये कॅश उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खातेदारांकडून होत आहे. आर्थिक गरज भासल्यास एटीएममधून त्याची पूर्तता होईल. याअगोदर ज्या दिवशी बँक बंद असते त्या दिवशी एटीएममध्येही खडखडाट जाणवतो. असे न होता ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएममध्ये सुटीच्या कालावधीत कॅशचा भरणा करावा, अशी मागणी होत आहे.