महामार्गाच्या कामादरम्यानच ब्लॅक स्पॉट शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:09+5:302021-07-18T04:25:09+5:30

या बैठीकस खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालींधर बुधव, राजेंद्र पळसकर, जि. प.चे उपमुख्य ...

Find black spots during highway work | महामार्गाच्या कामादरम्यानच ब्लॅक स्पॉट शोधणार

महामार्गाच्या कामादरम्यानच ब्लॅक स्पॉट शोधणार

googlenewsNext

या बैठीकस खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालींधर बुधव, राजेंद्र पळसकर, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

या बैठकीत मराठवाड्यातून शेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर-जानेफळ दरम्यान अपघाती वळण असून, ते अपघात मुक्त करण्यात यावे. येथील उतार दोषपूर्ण आहे. तो व्यवस्थित केला जातो. तसेच चिखली-मेहकर मार्गावर लव्हाळानजीक पुलावर वाहन आदळते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पुलाची निर्मिती दोषपूर्ण आहे. सोबतच अमडापूरवरून साखरकेर्डा गावाकडे जाताना असलेल्या अंडर ब्रिजमधून मोठे वाहन मुख्य रस्त्यावर येऊ शकत नाही. हीच परिस्थिती साखरखेर्डा वरून चिखलीकडे येताना असून, मोठ्या वाहनांना वळण घेण्यात अडचण जाते. त्यामुळे येथेही मोठ्या अपघाताची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे येथील कामामध्ये तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या.

--शेत रस्त्यांचेही लेव्हलिंग व्हावे--

राष्ट्रीय महामार्गामधून शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यात उतरतानाही अनेक चुका झाल्या आहेत. याची लेव्हल व्यवस्थित केलेली नाही. यासंबंधी एक समिती नेमून त्याचा अहवाल मागवावा. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी नियुक्त करून ही कामे मार्गी लावण्याची गरज खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.

Web Title: Find black spots during highway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.