रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ५.७० लाख रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:36+5:302021-04-09T04:36:36+5:30
तालुक्यातील जानेफळ येथील ठाणेदार राहुल गोंधे हे रात्री गस्तीवर असताना अवैध गौण खनिज रेतीची वाहतूक करणारी दोन वाहने (एमएच ...
तालुक्यातील जानेफळ येथील ठाणेदार राहुल गोंधे हे रात्री गस्तीवर असताना अवैध गौण खनिज रेतीची वाहतूक करणारी दोन वाहने (एमएच २२ बी.एच. २८२९) व (एमएच २१ बी.एच. ७४४४) पकडली. वाहनमालक सुनील उद्धव सदावर्ते व शिवाजी कुंडलिक गुज्जर (रा. तळणी, ता. मंठा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वाहनाने जडवाहतूक करून प्रमाणावर अवैधरित्या रेती वाहतूक केली जात होती. यातील एका वाहनामध्ये एक ब्रास व दुसऱ्या वाहनामध्ये तीन ब्रास रेती वाहतुकीचा परवाना संपुष्टात असताना, सहा ब्रास रेती वाहतूक केली जात होती. या दोन्ही वाहनांवर सरकारी सुटी आल्यामुळे सहा दिवस दंडात्मक कारवाई झाली नाही. त्यामुळे गुरुवारी दोन्ही वाहनांवर तहसीलदार डॉ. संजय गरकल व उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी संयुक्तिक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार कारवाई केली. दोन्ही वाहनमालकांना एकूण ५ लाख ७० हजार ६४८ रुपये दंड करण्यात आला आहे. या दंडाची रक्कम भरून वाहनमालकांनी आपले वाहन जानेफळ पोलीस स्टेशनमधून सोडवून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर पाटील-ठाकरे यांनी या अवैध गौण खनिज वाहतूक बंद करण्याबाबत तहसीलदारांना १५ दिवसांपूर्वीच निवेदन दिले होते. या कार्यवाहीबाबत सतत पाठपुरावा करून संबंधित वाहनांवर कारवाई करण्याकरिता तहसीलला पाठपुरावा केला.