विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: October 1, 2014 12:43 AM2014-10-01T00:43:13+5:302014-10-01T00:43:13+5:30

बुलडाणा तालुक्यातील महिलेची आत्महत्या, सासु सास-यासह पतीविरूद्ध गुन्हा दाखल.

An FIR has been lodged against three accused in the marriage case | विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

Next

बुलडाणा : तालुक्यातील दहीद बु. येथील २२ सप्टेंबर रोजी एका २५ वर्षीय विवाहीतेने स्वत:ला जाळून आत्महत्या केल्या प्रकरणी, बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील दहीद बु. येथे २२ सप्टेंबर रोजी एका २५ वर्षीय विवाहितेने स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २८ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आज सासरच्या तीन लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. खामगाव येथील चांदमारी परिसरात राहणारा मृत विवाहितेचा भाऊ मारोती विठ्ठल नगरदाने यांनी पोलिसात तक्रार दिली की, मृत विवाहिता सोयम हीचा विवाह २0११ रोजी दहिद बु. येथील नरेंद्र रामराव दिघोळे याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसात सोयमला सासरची मंडळी शारीरिक आणि मानसिक त्रास देत वारंवार पैश्याची मागणी करत होते. शिवाय पती नरेंद्र याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे दोघांमध्ये नेहमीच घरात भांडण होत असे. या प्रकारातून त्रस्त झाल्यामुळे सोयमने २२ सप्टेंबर रोजी स्वत:ला जाळून घेतले. उपचार दरम्यान २८ सप्टेंबर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. यामुळे भावाने दिलेल्या तक्रारींच्या आधारे बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी पती नरेंद्र रामराव डिघोळे, सासरा रामराव डिघोळे, सासू बेलाबाई डिघोळे या तिघांवर भादंविच्या कलम ४९८(अ), ३0४(ब) अधिक ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सासू बेलाबाई हीला अटक करण्यात आली असून, इतर दोघे फरार आहेत. पुढील तपास ठाणेदार भामरे करीत आहेत.

Web Title: An FIR has been lodged against three accused in the marriage case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.