चिखलीत आग लागून महासेलचे दुकान भस्मसात; लाखो रूपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 19:32 IST2018-01-12T19:27:16+5:302018-01-12T19:32:16+5:30
चिखली : स्थानिक डी.पी.रोडवरील हिंदुसुर्य महाराणा प्रताप पुतळ्याजवळ असलेल्या ‘झी महासेल’ या दुकानाला १२ जानेवारीच्या पहाटे आग लागल्याने विविध वस्तु व कपड्यांच्या सेलचे हे दुकना पूर्णत: जळून खाक झाले.

चिखलीत आग लागून महासेलचे दुकान भस्मसात; लाखो रूपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : स्थानिक डी.पी.रोडवरील हिंदुसुर्य महाराणा प्रताप पुतळ्याजवळ असलेल्या ‘झी महासेल’ या दुकानाला १२ जानेवारीच्या पहाटे आग लागल्याने विविध वस्तु व कपड्यांच्या सेलचे हे दुकना पूर्णत: जळून खाक झाले आहे. तर शेजारी असलेल्या जयेश फोटो स्टुडीओचे लाखो रूपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
१२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणा-या काही नागरिकांना स्थानिक डी.पी.रोडवरील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ असलेल्या महासेलच्या दुकानामधून धुरीचे लोळ बाहेर पडतांना दिसल्याने धावाधाव सुरू झाली. मात्र, या दुकानात कपडे, स्टेशनरी, गृहपयोगी वस्तु मोठ्याप्रमाणात असल्याने या आगीने रौद्ररूप धारण केल्याने याठिकाणी जमलेल्या नागरीकांनी मिळेल त्या साधनांव्दारे आग विझवण्यासाठी प्रयत्न चालविले. दरम्यान आग विझविण्यासाठी नागरिक पाणी घेऊन येत असतांना विद्युत तारांमधून शॉट सर्कीट होऊ लागले, तसेच महासेल मधूनही मोठा आवाज आल्याने आग विझवण्यासाठी आलेले नागरीकांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. काही नागरिकांनी महावितरण कार्यालयाला व न.प.कार्यालयात फोन केला मात्र कुणीही फोन उचलला नसल्याचे नागरिकांनी सांगिलते. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त चिखली अग्नीशमन दल सिंदखेडराजा येथे गेले असल्याने बुलडाणा येथून अग्नीशमन दल चिखलीला येईपर्यंत महासेलचे हे दुकान संपूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीची झळ शेजारी असलेल्या जयेश फोटो स्टुडीओ बसली. या फोटो स्टुडीओतील व घरीतील सुमारे ५ लाख रूपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे जयेश बेलोकार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर तर वृत्तलिहेपर्यंत महासेलच्या मालकाने फिर्याद दिली नसल्याने त्यांचे किती नुकसान झाले हे कळू शकले नाही.