आग लावल्याने दीड लाखाचा ठिबक संच जळाला
By admin | Published: March 24, 2015 01:10 AM2015-03-24T01:10:45+5:302015-03-24T01:10:45+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील घटना.
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाचे कृत्य करीत आग लावल्याने एका शे तकर्याचा दीड लाखाचा ठिबक संच जळाल्याची घटना तालुक्यातील पोफळ शिवणी येथे २२ मार्च रोजी घडली. सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील रहिवासी मधुकर भिकनराव देशमुख यांनी पाच एकरा तील शेतीसाठी दीड लाख रुपये किमतीचा ठिबक संच खरेदी केला होता. त्याद्वारे त्यांनी कमी पाण्यात जास्तीत जास्त शेती सिंचनासाठी आणण्याचे काम हाती घेतले होते. ठिबक संचाचे काम संपल्यानंतर त्याची सुमारे २0 बंडले जमा करून देशमुख यांनी शेतात ठेवली होती. याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने ठिबक संच पेटवून दिला. घटना समजल्यानंतर देशमुख कुटुंब शेतात धावत गेले. तोपर्यंत उशीर झाला होता. ठिबकच्या सर्व नळ्या जळून खाक झाल्याने तब्बल दीड लाखांची हानी झाली आहे. या घटनेमुळे सदर शेतकर्याला मोठी आर्थिक झळ बसली आहे. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकरी मधुकर देशमुख यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.