धाड येथे अग्नितांडव; सहा दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:31 AM2020-05-29T10:31:01+5:302020-05-29T10:32:08+5:30

साधारण चार तासापेक्षा जास्त अधिक वेळ ही आग धगधगत होती.

Fire at Dhad; Fire at six shops | धाड येथे अग्नितांडव; सहा दुकानांना आग

धाड येथे अग्नितांडव; सहा दुकानांना आग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : स्थानिक बसस्टँडनजीकच्या एका भंगारच्या दुकानास अचानक आग लागल्याची घटना २८ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. या आगीचा सहा दुकानांना फटका बसला असून, तीन दुकाने जळुन खाक झाली आहेत. साधारण चार तासापेक्षा जास्त अधिक वेळ ही आग धगधगत होती. यामध्ये जवळपास ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
स्थानिक बसस्टँड लगत अनेक छोटी मोठी दुकाने आहेत. त्यामध्ये शे. फीरोज शे फत्तु (रा.पारध) यांचे भंगार खरेदीचे मोठे दुकान आहे. त्यांच्या दुकानाला गुरूवारी सकाळी मागील बाजूस अचानक आग लागली. आग लागताच पोलिसांनी धाव घेतली मात्र आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग वाढतच गेली. गावातील खासगी टँकरधारक रमेश घाडगे, गजानन देशमुख, सतीष जाधव, शे.अजिम शे.मजिद, शे. आसिफ यांनी तात्काळ आपले टँकर घटनास्थळी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परिसरातील शांताराम शिरसाट, शे.नदिम शे.अलिम यांनी घरच्या बोअरचे पाणी उपलब्ध करून दिले. परंतू आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याने ती आटोक्यात आणणे अवघड झाले होते.
ग्रामपंचायत, महसूल विभागाच्या लोकांनी धरणातून एका पाईपलाईनच्या माध्यमातून घटनास्थळी पाणी आणले. आग लागल्या नंतर दोन तासांनी बुलडाणा नगर परिषद, चिखली नगर परिषद आणि जाफराबाद नगर परिषद वतीने अग्नीश्यामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. मात्र आगीचे रौद्र रूप पाहता ह्या वाहनातील पाणी संपल्यावर एका वाहनात धरणातुन येणारे पाणी सोडले. तर दुसऱ्या वाहनात गावालगतच्या विहीरीतुन पाणी भरल्या गेले. साधारण चार तासाने ही आग आटोक्यात आली. मात्र लगतच्या नामदेव मोहिते यांच्या हॉटेल आणि लॉजिंग, नंदकिशोर सोनवने यांचे बांबूचे दुकान आगिच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्यांचेही नुकसान झाले. महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी ए. एन. शेळके, तलाठी प्रभाकर गवळी, कोतवाल बापू तोटे ह्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ठाणेदार दिनेश झांबरे, पोलीस चमू यावेळी उपस्थित होती.
 

असे झाले नुकसान
आगीमुळे एकुण ४५ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भंगार दुकानाचे २० लाख ८० हजार रुपये, तर हॉटेल लाँजिंग सात लाख ४५ हजार रुपये व बांबूच्या दुकानाचे चार लाख, पेंन्टरच्या दुकानाचे ८६ हजार रुपये, हाडर्वेअरचे ३ लाख १८ हजार रुपये, अ‍ॅटोपार्ट व संगणक सेंटरचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Web Title: Fire at Dhad; Fire at six shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.