बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला

By संदीप वानखेडे | Published: May 27, 2023 04:45 PM2023-05-27T16:45:31+5:302023-05-27T16:46:06+5:30

गायकवाड यांचे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Fire due to short circuit in Buldhana; Ten quintals of cotton were burnt | बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला

बुलढाण्यात शाॅर्टसर्किटमुळे आग; दहा क्विंटल कापूस जळाला

googlenewsNext

किनगाव जट्टू : खांबावरील तार तुटून गाेठ्यावर पडल्याने शाॅर्टसर्किट हाेऊन कापूस जळाला़ ही घटना किनगाव जट्टू येथे २७ मे राेजी घडली़ यामध्ये शेतकऱ्याचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले़ सुदैवाने जीवितहानी टळली.

किनगाव जट्टू येथील श्रीराम आश्रुजी गायकवाड यांचे शेत दुसरबीड रस्त्यावर आहे़ त्यांनी शेतातच गोठा, कांदा चाळ बांधलेली आहे़ त्यांच्या घराजवळ असलेल्या राेहित्राचा विद्युत तार तुटला़ विद्युत प्रवाह असलेल्या या तारेमुळे गाेठ्यात शाॅर्टसर्किट झाले. त्यामुळे घरातील कापसाने पेट घेतला. यामध्ये जवळपास दहा क्विंटल कापूस जळून खाक झाला.

या घटनेत गायकवाड यांचे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी वसुदेव जायभाये यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला़ यावेळी ज्ञानेश्वर कायंदे, कोतवाल मधुकर मिसाळ उपस्थित हाेते. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे बाजूला गुरांचा चारा, गुरे व कार उभी होती. तत्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला़ शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी हाेत आहे.

 

Web Title: Fire due to short circuit in Buldhana; Ten quintals of cotton were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.