शॉर्ट सर्किटमुळे आग, पाच लाख रुपयांचे नुकसान
By संदीप वानखेडे | Published: April 7, 2024 07:32 PM2024-04-07T19:32:22+5:302024-04-07T19:32:38+5:30
शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पशुखाद्य, ज्वारी आणि कृषी साहित्य जळाल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
देऊळगाव राजा: शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पशुखाद्य, ज्वारी आणि कृषी साहित्य जळाल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ६ एप्रिल रोजी घडली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे कुंभारी येथील चिखली रोड लगत जैन फार्मर्स जवळ असलेल्या डीपी मधून शॉर्टसर्किट झाले त्यामुळे, आग लाग लागून यामध्ये मौजे कुंभारी येथील शेतकरी भीमा शंकर लाड आणि प्रवीण शंकर लाड यांचे गट नंबर ११७ या ठिकाणी असलेले शाळूचा चारा आणि विकत घेतलेला चारा असा एकूण सोळा हजार पेंडी चारा, याच शेतामधील जवळपास तीस क्विंटल शाळू आणि वीस ट्रॉली खत असा एकूण जवळ पास पाच ते साडे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले.
स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ही आग आटोक्यात न आल्याने वाढतच गेली़ त्यामध्ये जैन फार्मर्स यांचे नेट सुद्धा एका साईडने जळाले याचा पंचनामा रवी खरात प्रभारी सहाय्यक अभियंता यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे महावितरणने याचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्याकडून होत आहे.