खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:57 PM2021-01-11T12:57:45+5:302021-01-11T12:57:56+5:30

Fire Audit News शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांच्या अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करण्याची गरज आहे. 

Fire fighting system in private hospitals not sufficient | खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी!

खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी!

Next
ठळक मुद्देअग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्र अजूनही घेण्यात आलेले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा ताेकडी असल्याचे चित्र ‘लाेकमत’ने रविवारी केलेल्या रियालिटी चेकमध्ये आढळले. अनेक माेठ्या रुग्णालयांमध्ये केवळ आग विझवणारे अग्निशमन यंत्रच लावलेले आहे. तसेच अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्र अजूनही घेण्यात आलेले नाही. 
 दर ११ महिन्यांनी अग्निशमन यंत्रांची व आगीच्या संदर्भाने रुग्णालय सुरक्षित आहे की नाही, यासंदर्भात सर्वेक्षण करून पालिकेच्या अग्निशामक दलाकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी खासगी रुग्णालयांकडून नगरपालिका प्रशासनाकडे अर्ज करण्यात येताे. भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रियालिटी चेक केले असता रुग्णालयांमध्ये केवळ प्राथमिक स्वरूपाची यंत्रसामग्री आढळली. इतर सुविधांकडे मात्र,  खासगी रुग्णालयांच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे. तसेच रुग्णालयाची क्षमता पाहून तिथे अग्निशमन यंत्रणा कुठली हवी याविषयीचे सर्वेक्षण नगरपालिकेकडून करण्यात येते; मात्र मध्यंतरी नगरपालिकेतील अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्त हाेते. सध्या हे पद भरलेले असले तरी शहरातील एकाही खासगी रुग्णालयाकडून अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भंडाऱ्यातील आगीची दुर्घटना पाहता नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांच्या अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करण्याची गरज आहे. 


अखेर अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित!
सिंदखेडराजा : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न एरणीवर आला आहे.सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी याच संदर्भात लाेकमतने रियालिटी चेक केला असता येथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समाेर आले हाेते. याविषयीचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच आराेग्य विभागाने त्याची तत्काळ दखल घेत  अग्निप्रतिबंध सिलिंडर बसविले आहे. रविवारच्या अंकात सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता बिराजदार यांनी रविवारी आपल्या वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन अग्निशमन यंत्रणा आवश्यक असल्याचे पटवून दिले. त्यानुसार दुपारी २ वाजेपर्यंत अग्निशमन प्रतिबंध सिलिंडर दवाखान्यात उपलब्ध करून त्याचे कर्मचाऱ्यांना समोर प्रात्यक्षिक करण्यात आले. आपत्कालीन वेळी या यंत्रणेचा उपयोग करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.


वर्षातून एकदाच हाेते पाहणी 
अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरणासाठी संबंधित खासगी रुग्णालये नगरपालिकेकडे अर्ज करतात. त्यानंतर त्यांची  वर्षातून एकदाच त्यांची प्रमाणपत्र देण्यापुरती तपासणी हाेते. एकदा प्रमाणपत्र मिळाले की ११ महिने त्याकडे दुर्लक्ष हाेते. यादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये प्रमाणपत्र मिळवण्याच्या दिवशी असलेली यंत्रणा नंतरही कार्यान्वित आहे किंवा नाही याची पडताळणीच हाेत नाही. त्यामुळे, अनेक खासगी रुग्णालयांचेही याकडे दुर्लक्ष हाेते. त्यामुळे खासगी रुग्णालयांसह शासकीय, खासगी कार्यालयांचे नियमित ऑडिट हाेण्याची गरज आहे.

Web Title: Fire fighting system in private hospitals not sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.