ज्ञानगंगा अभयारण्यातील गवताला आग
By Admin | Published: February 18, 2017 03:22 AM2017-02-18T03:22:26+5:302017-02-18T03:22:26+5:30
ज्ञानगंगा अभयारण्यातील परिसरातील बोथा परिसरातील गवताला आग लागल्यामुळे सुमारे २ ते ४ हेक्टरवरील गवत जळून खाक झाले.
खामगाव, दि. १७- ज्ञानगंगा अभयारण्यातील परिसरातील बोथा परिसरातील गवताला आग लागल्यामुळे सुमारे २ ते ४ हेक्टरवरील गवत जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. खामगाव ते बुलडाणा रस्त्यावर ज्ञानगंगा अभयारण्य असून या अभयारण्यातील बोथा बीट क्रमांक २ परिसरात दुपारचे सुमारास गवताला आग लागली. गवताला आग लागून आग पसरत असल्याचे लक्षात येताच बोथा येथील ग्रामस्थांनी तातडीने आग विझविणे सुरु केले. तसेच याबाबतची माहिती वन्य जीव विभागाच्या अधिकार्यांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात बोथा ग्रामस्थ व वन्यजीव विभागाच्या कर्मचार्यांना यश आले. मात्र तोपर्यंत या आगीत अभयारण्यत परिसरातील दोन ते चार हेक्टरवरील गवत जळून खाक झाले. अज्ञात व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे सदर आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.