मलकापूर येथे पालिका शाळेला आग; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:21 AM2018-02-26T01:21:05+5:302018-02-26T01:21:05+5:30
मलकापुर : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील नगर परिषदेच्या शाळेतील महत्त्वाच्या दस्तावेजासह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. सुटीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

दरम्यान, रविवार असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे अनेकजण सांगत होते. पाणी पुरवठा विभागाच्या बाजूलाच नगरपालिकेची शाळा आहे. यामधून दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास धूर निघताना दिसून आला. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली.
आगीत शाळेतील महत्त्वाचे दस्तावेजासह विविध दाखले जळून खाक झाले. यामध्ये नगर परिषद क्रमांक-१ व नगर परिषद उर्दू शाळेमधील शैक्षणिक साहित्यही ठेवण्यात आले होते. अग्निशमन विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी आग विझवली; मात्र कागदपत्रे वाचू शकली नाहीत. रविवार असल्याने शाळेला सुटी होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.