पैनगंगा वॉटर टँकच्या इमारतीत आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:32 AM2021-03-07T04:32:08+5:302021-03-07T04:32:08+5:30
लाखो मेहकर : येथील लोणार फाट्यावरील साई एजन्सीच्या पैनगंगा वाॅटर टँक बनविण्याच्या मशीनमध्ये अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी ...
लाखो
मेहकर : येथील लोणार फाट्यावरील साई एजन्सीच्या पैनगंगा वाॅटर टँक बनविण्याच्या मशीनमध्ये अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यामध्ये वॉटर टँक जाळून खाक झाले असून, त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मेहकर- चिखली रस्त्यावरील लोणार फाट्यावर असलेली साई एजन्सीच्या पैनगंगा वॉटर टँक इमारतीमध्ये नवीन वॉटर टाक्या तयार करण्याचे काम सुरू असताना अचानकपणे मशीनमध्ये आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली. पाईपने पाणी टाकून आग विझविली. या आगीत नवीन तयार होत असलेल्या पाण्याच्या टाक्यासह मशीनमधील बर्नल, मोटर, कोटिंग आदी जळून पूर्णपणे निकामी झाले आहेत. नगर परिषदेचे अग्निशामक दलही घटनास्थळी पोहोचले होते. मात्र तोपर्यंत नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली गेली. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे एजन्सी चालक संजय भास्कर मिनासे यांनी सांगितले.