मेहकरात स्वीट मार्टला आग, लाखाेंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:25 PM2021-01-19T12:25:26+5:302021-01-19T12:25:41+5:30
Mehkar Fire News मेहकरातील हादिमया काॅम्प्लेक्समध्ये साेमवारी रात्री आग लागली.
मेहकर: विद्युत स्पार्किंगमुळे मेहकरातील हादिमया काॅम्प्लेक्समध्ये साेमवारी रात्री आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांसह अग्नशमन दलाच्या बंबांनी आग विझवल्याने माेठा अनर्थ टळला. या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले.
सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास विद्युत स्पार्कींगमुळे मेहकर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगर परिषद समोरच्या हादिमिया कॉंप्लेक्समधील बालाजी स्वीट मार्ट दुकानात अंदाजे विद्युत स्पार्कींगमुळे भीषण आग लागली. या दुकानाच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या तारीक खान यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत दुकानाचे शटर तोडून भरलेले दोन गॅस सिलेंडर तात्काळ बाहेर काढले. त्यामुळे मोठा अपघात टळला. तसेच तारीक खान यांनी घरच्या पाण्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मेहकर नगर पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. अखेरीस रात्री अडीच वाजताच्या सुमारास आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले.यामध्ये लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी तारिक खान, कॉंग्रेस चे गटनेते आलिम ताहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आफताब खान,सुमेर खान,तौसिफ खान, पोलीस उपनिरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक घुले,हेड कॉन्स्टेबल श्रीराम निळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोढे, रामेश्वर रिंढे, आरोग्य निरीक्षक विशाल शिरपुरकर,इलेक्ट्रिशियन नारायण इंगळे,गजानन कुलाळ,नसीर खान,तेजुसिंग आदिंनी अथक परिश्रम घेतले.