पर्यटनस्थळ ईको सायन्स पार्क मध्ये आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:07 PM2021-05-21T17:07:24+5:302021-05-21T17:10:42+5:30

Fire News :ग्रामस्थांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.

Fire in tourist destination Eco Science Park | पर्यटनस्थळ ईको सायन्स पार्क मध्ये आग

पर्यटनस्थळ ईको सायन्स पार्क मध्ये आग

googlenewsNext

संग्रामपूरः (बुलडाणा) मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाली येथील पर्यटक स्थळ इको सायन्स पार्कमध्ये अचानक आग लागल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हि आग शूक्रवारी दूपारी १ वा. च्या दरम्यान लागली होती. पार्कमधील गवताने पेट घेतल्याने आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. पार्कमध्ये वेल्डिंगचे काम सूरू असल्याने आग लागली असावी असा अंदाज आहे. दरम्यान काही कालावधीतच आगीचे तांडव सुरू झाले होते. पार्क मध्ये लागलेल्या आगीचे लोट वसाली गावाकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इको सायन्स पार्कला लागून आदिवासी बांधवांची वस्ती सुरू होते. लगत असलेल्या घरांकडे आगीची वाटचाल पाहता गावकऱ्यांनी पार्कमध्ये धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये पार्क मधील गवत जळून खाक झाले असून इतर नुकसान झाले नसल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे. वन्यजीव विभागातील कर्मचारी व आदिवासी बांधवांनी वेळीच आग नियंत्रणात आणून विझविली. अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारी साठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वसाली येथे ३२ कोटी रुपयांच्या वर खर्च करून ईको सायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे. ३० हेक्टर क्षेत्रफळावर उभारण्यात येत असलेल्या उद्यानात २८ एकर क्षेत्रात २५ हजाराच्यावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. यात नारळ, आंबा, सिताफळ, बांबू व फुलझाडांचा समावेश आहे. सदर वृक्षलागवड ईको नक्षत्र वनात करण्यात आली असून पार्कच्या दूसय्रा भागात आग लागली होती. आगीत ठिबक सिंचन संचासह इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. मात्र वन्यजीव विभागाकडून इतर नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कामादरम्यान लागली आग

कंत्राटदाराकडून पार्कमध्ये पर्यटकांसाठी खोल्यांचे बांधण्याचे काम सुरू आहे. लोखंडी पाईप, कापणे जोडण्यासाठी वेल्डिंग मशीन उपयोगात आणण्यात येत असल्याची माहिती आहे. काम करीत असतांना वेल्डिंगची ठिनगी पडली की, शॉर्टसर्किट मूळे हि आग लागली अजून हे स्पष्ट झाले नाही.

Web Title: Fire in tourist destination Eco Science Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.