मलकापूरात दोन जिनिंग, बायोटेक कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:09 AM2020-04-08T11:09:26+5:302020-04-08T11:09:31+5:30
लक्ष्मी नगरातील अॅग्रो बायोटेक कंपनी व जाधववाडीतील दोन जिनींग फॅक्ट्रीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: येथील लक्ष्मी नगरातील अॅग्रो बायोटेक कंपनी व जाधववाडीतील दोन जिनींग फॅक्ट्रीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्यात अंदाजे दीड कोटींचे नुकसान झाले.
लक्ष्मी नगरातील चैतन्य अँग्रो बायोटेक प्रा.लि. या कंपनीला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खाजगी पाणी वाहतूक करणारे चालक मालक पंकज राजेंद्र खराडे त्यांचे टँकर नजिकच्या मार्गावरून जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला असता त्यांनी तात्काळ टँकरने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, राजेंद्र वाडेकर, पालिकेचे अग्निशमन दल घेवून घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी कंपनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तत्पूर्वी कंपनीचे संचालक अशोकराव देशपांडे व प्रसंन्ना देशपांडे घटनास्थळी दाखल झाले होते. कंपनीचे पश्चिमेकडील स्क्रँप पूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवानं आग पुढे सरकण्यापूर्वी आटोक्यात आल्याने लाखोच नुकसान झाले मात्र मोठा अनर्थ टळला. नांदुरा रस्त्यावर जाधववाडीतील डबल डायमंड फँक्टरीत घडली. त्या ठिकाणी जिनमाता जिनिंग कंपनीच्या सुमारे ४०० गठाणी तर निखिल ट्रेडींग कंपनीच्या सुमारे ३०० गठाणी आगीत जळून खाक झाल्या. या आगीविषयी माहिती देताना उपस्थितांनी सांगितले की ,गठाणीवर लावलेला खतांच्या पिशव्यांंचा पडम सुसाट हवेमुळे इलेक्ट्रीक डि.पी.वर पडल्याने पेटला.त्यामुळे कापसाच्या गठाणींनी पेट घेतला आणि त्याच रूपांतर मोठ्या आगीत झाल्याने अंदाजे सव्वा कोटीच्या कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्याची माहिती आहे.