खामगाव येथील आठवडी बाजारात आग; १२ दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 08:50 PM2021-04-10T20:50:43+5:302021-04-10T20:58:48+5:30
Fire: खामगाव येथील आठवडी बाजारात आग,;१२ दुकाने जळून खाक झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: स्थानिक आठवडी बाजारातील भाजी पाल्याच्या गोदामांना आग लागली. ही घटना शनिवारी ७.४५ वाजता घडली. यात १०-१२ गोदाम जळून खाक झालीत. खामगाव शहरातील मध्यवस्तीत आठवडी बाजार आहे. या बाजारात भाजीपाल्याची हराशी होते. त्यामुळे काही व्यावसायिकांनी येथेच सुका आणि ओला भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी गोदामे उभारली आहेत. यातील एका दुकानाला रात्री ७.४५ वाजता दरम्यान आग लागली. त्यानंतर एकापाठोपाठ १०-१२ दुकाने शनिवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलीत. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला आहे. रात्री साडे आठवाजेपर्यंत अग्नीशमन विभागाने पाण्याचे तीन बंब रिचविले होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी आग विझविणे सुरू होते. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आगीचे भीषणतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. .
१२ गोदाम जळून खाक
आगीत आठवडी बाजारातील १२ गोदाम जळून खाक झालीत. यामध्ये संतोष राजाराम क्षीरसागर, विनोद दशरथ क्षीरसागर, गजानन शंकरराव डाहे, बोदडे टेडर्स, सागर मीरची भांडार, राखोंडे टेडर्स, सादीक बागवान ट्रेडर्स, बळीराम निमकर्डे, नशीब फ्रुट, गोलू ट्रेडर्स, शोहरत खान यांच्या दुकानासह मोतीराम बाबा ट्रेडर्सचा समावेश आहे. परिसरातील घरांमध्ये धुराचे लोट - गोदामांना लागलेल्या आगीने क्षर्णाधात रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट दूरपर्यंत पसरले. आगीच्या ज्वाळासोबतच प्रचंड धूराचे लोटही परिसरात पसरले होते. त्यामुळे परिसरातील व्यापाºयांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.